
G7 visa restrictions for foreign workers
esakal
डॉ. अनिल पडोशी
गेल्या कांही वर्षांमध्ये सर्वार्थाने विकसित, श्रीमंत अशा जी-७ या समूहातील अनेक देशांनी परदेशी कामगारांना आपल्या देशामध्ये येण्यावर बंधने घातली आहेत. याचे साधे कारण असे की, जगातील गरीब देशातून येणारे कुशल कामगार कंपन्यांना स्वस्त पडतात, त्यामुळे आम्हाला रोजगार मिळत नाही, अशी वैफल्याची भावना त्या त्या देशांतील स्थानिक तरुणांमध्ये निर्माण झाली आहे.
डो नाल्ड ट्रम्प यांनी गेल्या २१ सप्टेंबरपासून अमेरिकेमध्ये रोजगार मिळविण्यासाठी परदेशी कामगारांना बंधनकारक असलेल्या ‘एच-१ बी’ या व्हिसाचे शुल्क एक लाख डॉलर (साधारणत: ८८ लाख रु.) इतके वाढविले. भारतात उच्चशिक्षण घेऊन अमेरिकेमध्ये नोकरीसाठी (शक्य तर कायमच्या वास्तव्यासाठी) जाऊ इच्छिणाऱ्या भारतीय महत्त्वाकांक्षी तरुणांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.