
विशाखा बाग, कॉर्पोरेट ट्रेनर आणि इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर
gauribag7@gmail.com
आयुर्विम्याचा खरा अर्थ हा कुटुंबात अघटित काही घडले, तर कुटुंबाची व्यवस्था बघण्यासाठी म्हणून मिळणारा पैसा एवढाच आहे. परंतु, आपल्याकडे आयुर्विम्याकडे फक्त आर्थिक संरक्षण मिळावे म्हणून बघितले जात नाही, तर त्याकडे एक गुंतवणुकीचे साधन म्हणूनही बघितले जाते. परंतु, आयुर्विम्याकडे संपूर्णपणे गुंतवणुकीचे साधन म्हणून बघणे योग्य नाही. आयुर्विमा घेताना हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.