

Himalayan Environment Crisis
E sakal
उमेश झिरपे, (‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघा’चे अध्यक्ष )
तापमानवाढ, ऋतुचक्राचा बोजवारा, पूर, दुष्काळ, लुप्त पावणाऱ्या नद्या, आणि वाऱ्याच्या दिशांचं विस्कळीत होणं, हे सगळं फक्त आकड्यांत नाही, तर रोजच्या आयुष्यात दिसतंय. या बदलांचा खोलवर अनुभव जर कोणाला दरवर्षी येतो, तर तो गिर्यारोहकांना.
पर्वतांचा चेहराच बदलतोय. हिमाचा रंग फिकट होतोय, वाऱ्याची झुळूक गरम होतेय, आणि नद्यांचा आवाजही भेदरलेला वाटतो. गंगोत्रीला मी पहिल्यांदा २५ वर्षांपूर्वी गेलो होतो.
चार धामांपैकी एक असलेलं ते पवित्र स्थान, आणि त्यामागे विस्तारलेली गंगोत्री हिमनदी. आशिया खंडातील सर्वात मोठ्या हिमनद्यांपैकी एक.