

Hindustan Aeronautics Limited
esakal
भूषण ओक - bhushanoke@hotmail.com
‘विकसित भारता’च्या संकल्पनेत भारताला संरक्षण क्षेत्रात बलाढ्य आणि स्वयंपूर्ण बनवणे हेही एक उद्दिष्ट आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. ही देशातील संरक्षण क्षेत्रातील दुसरी मोठी कंपनी असून, ती विमाने, हेलिकॉप्टर, इंजिन आणि एव्हिऑनिक्स डिझाइन आणि संबंधित प्रणालींची रचना, विकास, उत्पादन, देखभाल आणि दुरुस्तीच्या व्यवसायात महत्त्वाची भूमिका बजावते. भारतीय संरक्षण क्षेत्रातील ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेत कंपनीचा वाटा अत्यंत महत्त्वाचा आहे.
मान उत्पादनाच्या संपूर्ण मूल्यसाखळीमध्ये असलेली एकात्मिक उपस्थिती हे हिंदुस्थान एरोनॉटिक्सचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. १९६४ मध्ये स्थापित या कंपनीला आता महारत्न दर्जा प्राप्त असून, हा दर्जा कंपनीची भक्कम आर्थिक कामगिरी आणि भारताच्या संरक्षण परिसंस्थेतील तिच्या महत्त्वाचे द्योतक आहे. संपूर्ण भारतात विखुरलेल्या वीस उत्पादन/दुरुस्ती विभागांद्वारे आणि नऊ संशोधन व विकास केंद्रांद्वारे कंपनी आपले कामकाज चालवते. कंपनीचे कार्य प्रामुख्याने तीन भागांमध्ये विभागलेले आहे.