
Agnibaan rocket
esakal
गिरिजा दुधाट
dayadconsultancies@gmail.com
माणसाने अग्नीचा शोध लावला आणि मानवी उत्क्रांतीमध्ये दोन टप्प्यांवर आमूलाग्र बदल घडून आले. पहिल्यांदा जेव्हा माणूस भटके जीवन सोडून शेतीमधून स्थिर होऊ पाहत होता आणि दुसऱ्यांदा जेव्हा माणसाने अग्नीचा वापर शस्त्रांमध्ये करायला सुरुवात केली त्या वेळी.
बारूदाचा (दारूगोळा) शोध लागल्यावर शस्त्रास्त्रांमधल्या अग्नीच्या वापराला अधिक विघातक आयाम प्राप्त झाले. बारूद आणि अग्नी यांची जोडगोळी तोफा, बंदूक, लहान-मोठी क्षेपणास्त्रे अशा अस्त्रांमधून रणांगणातून जिभल्या चाटत फिरू लागली. बारूद आणि अग्नी यांच्या संतुलित वापरातून मध्ययुगीन भारतात वापरलं जाणारं एक प्रभावी अस्त्र म्हणजे ‘अग्निबाण’!