Indian cinema
Esakal
सुलभा तेरणीकर
राजकमल कलामंदिरच्या ‘झनक झनक पायल बाजे’ने भारतीय रजतपटावर रंगांची उधळण केली खरी! रसिकांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं तरी रजतपटावर ‘कृष्णधवल’च होते आणि तरीही एखादी कविता लिहावी असं सुरेख छायाचित्रणही रसिकांना मोहवीत होतं. देशाच्या स्वातंत्र्यानंतर-विभाजनानंतर चित्रपटसृष्टीत आलेल्या लोकांचा संघर्ष संपला होता...
मराठी चित्रपटसृष्टीत कवी, लेखक लेखणीची जादू उधळीत होते. बंगालच्या न्यू थिएटर्सचे भव्य दरवाजे कायमचे बंद झाले होते; पण तिथूनच मुंबईत आलेले बिमल रॉय पुन्हा ‘देवदास’ घेऊन आले होते... पाणवठ्यावर पुन्हा कमलिनी फुलल्या होत्या देवदास-पारोची वाट पाहत...