
सुलभा तेरणीकर
saptrang@esakal.com
पुण्यात बेबी लतानं १९४२ मध्ये ‘नटली चैत्राची नवलाई’ गायलं तरी मा. विनायक काही मतभेद झाल्याने पुण्यातून कोल्हापुरात गेले आणि कर्त्या माणसासारख्या लतादीदी आपली भावंडं, माई यांच्यासह कोल्हापुरात आल्या. त्याच वेळी ‘प्रभात’मधून व्ही. शांताराम बाहेर पडले. अभेद्य ‘प्रभात’चा चिरा ढळला. दादासाहेब तोरणे यांचे ‘सरस्वती सिनेटोन’ बंद करावे लागले. भालजी पेंढारकर यांनी कोल्हापूरला जायचे ठरवले.