
सुलभा तेरणीकर
saptrang@esakal.com
बोलणाऱ्या, गाणाऱ्या सिनेमाचं असं काही श्रेयस भारतीयांच्या हाती आलं, की जुलमी राजवट, लादलेलं युद्ध, स्वातंत्र्यलढ्याची उर्मी, स्वातंत्र्य आणि रक्तरंजीत फाळणी ही त्यांनी परतवून लावली, झेलली, सहन केली आणि साहित्य, संगीत, वैचारिक, सांस्कृतिक वारसा याचं सुरम्य दर्शन घडवलं. सगळ्या संकटावर जणू मात केली. पु. ल. देशपांडे, सुनीताबाई, आचार्य अत्रे, वि. स. खांडेकर असे मराठी साहित्यिक या माध्यमात आले. आपल्याला पगार शंभर वाढवून द्या म्हणणाऱ्या देव आनंदने ‘नवकेतन’चा स्वतःचा ध्वज फडकवला आणि राज कपूरने ‘आग’च्या अपयशानंतर ‘बरसात’ केली प्रणयाची, संगीताची..!