
esakal
मेजर मोहिनी गर्गे – कुलकर्णी (निवृत्त)
mohinigarge2007@gmail.com
सन उन्नीसों पैसठ में हमको जान पड़ी
शरण आई जब फ़ौजां देवल रक्षा करी
दुश्मन हम पर बार बार घात करी
कृपा आई देवल की तोपा उलट पड़ी
भारत-पाकिस्तानमध्ये १९६५ साली झालेल्या युद्धाचा उल्लेख आणि वर्णन असणारे हे शब्द कुठल्या गीतातील नाहीत, तर चक्क देवीच्या आरतीतले आहेत. शक्तिस्वरूपिणी देवीची विविध रूपं आपण जाणतो, तिची आराधना करतो. तसंच, स्वराज्यस्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरित करणारी, त्यांचं रक्षण करणारी आई भवानी अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे.