
एचआयव्ही एड्स च्या आजाराविषयी भारतात बराच काळ जनजागृती केली जात होती. सध्या त्याची तीव्रता काहीशी कमी भासते आहे मात्र एड्स रुग्णांची संख्या कमी झालेली नाही.
अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) लेनकॅपावीर (Lenacapavir) हे एक नवीन इंजेक्शन आणलं आहे. एचआयव्ही एड्स विरोधात ते ९९.९% संरक्षण देऊ शकते, असा दावा केला जातोय. हे इंजेक्शन सहा महिन्यांच्या अंतराने दोन मात्रांमध्ये दिलं जातं. मात्र त्यासाठीचा खर्च खूप जास्त आहे.
या इंजेक्शनसाठी जवळपास ₹२४ लाख (२८,२१८ डॉलर्स) खर्च येतो. लेनकॅपावीर हे एचआयव्ही प्रतिबंधक औषधांच्या प्री-एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस (PrEP) वर्गात मोडते. मात्र भारतातील राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेने (NACO)अद्याप PrEPचा समावेश आपल्या सार्वजनिक आरोग्य योजनांमध्ये केलेला नाही.