

AI content safety
esakal
२०२० मध्ये अमेरिकेतील एका जोडप्याने आपल्या नवजात मुलाचे नाव ‘नल’ (Null) ठेवण्याचा प्रयत्न केला. ही केवळ नावाची निवड नव्हती; तर एक जाणूनबुजून केलेला प्रयोग होता. संगणक प्रोग्रामिंगमध्ये ‘Null’ म्हणजे ‘काहीही नाही (निरंक)’ असा अर्थ असतो. त्यांना हे पाहायचे होते, की जेव्हा मानवी नाव या संगणकीय शून्य मूल्याशी टक्कर देते तेव्हा काय घडते. परिणाम अपेक्षित होता - संपूर्ण गोंधळ! सरकारी डेटाबेसमध्ये त्रुटी येऊ लागल्या, अर्ज नाकारले गेले आणि अनेक विभागांच्या सिस्टीम क्रॅश झाल्या. एका साध्या नावाच्या निवडीतून एक गंभीर वास्तव उघड झाले : आपल्या डिजिटल सिस्टीम माहितीवर प्रक्रिया करताना किती असुरक्षित आहेत... मानवी आणि यांत्रिक भाषेतील ही मूलभूत तफावत आजही अनेक समस्यांना जन्म देत आहे आणि ती समस्या आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात अधिक धोकादायक स्वरूपात समोर आली आहे.