
प्रसाद घारे
prasad.ghare@gmail.com
‘आयुष्याच्या वळणावर नवनव्या संधी तुमची वाट पाहात उभ्या असतात. तुमच्याकडे या संधीचे सोने करण्याची कला हवी.’ हे वाक्य आपण अनेकदा ऐकले किंवा वाचले असेल. मात्र, हे वाक्य प्रत्यक्ष कृतीत आणणाऱ्या व्यक्ती आपल्या आजूबाजूला वावरत असतात, याची कल्पना आपल्याला नसते. पुण्यातील एका महिलेने अशी संधी अचूक हेरली आणि ‘पाळणाघर’ या संकल्पनेचे रूपांतर एका मोठ्या व्यवसायात केले.
भारताच्या कानाकोपऱ्यात खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचे (खाउजा) वारे १९९१ पासून वाहायला सुरुवात झाली आणि अनेक महिलांना, पुरुषांना, तरुणाईला नवनव्या संधी खुणावू लागल्या. ही संधी आपले दार ठोठावत आहे, याची जाणीव ज्यांना झाली, त्यांनी दार उघडून या संधीचे स्वागत केले आणि आपले आयुष्य आमूलाग्र बदलून टाकले.