
esakal
अच्युत गोडबोले, रोहित पांढारकर
saptrang@esakal.com
गुगल डीपमाइंडचं जेमिनी आणि ओपनएआयचं नवं एआय मॉडेल या दोघांनी मानवी विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करत आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाडमध्ये (आयएमओ) चक्क गोल्ड मेडल पटकावलं! जेमिनीनं ६ पैकी ५ प्रश्न अचूक सोडवले आणि तेही सविस्तर पुराव्यासह. ओपनएआयचं मॉडेलही तितकंच ताकदवान ठरलं. या पार्श्वभूमीवर ‘एआय’च्या प्रगतीच्या पुढील टप्प्यांचा आढावा.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अल्गोरिदम्समध्ये गणिताचा खूप वापर होतो. विशेषतः लीनियर अल्जिब्रा, कॅल्क्युलस, मॅट्रायसेस आणि स्टॅटिस्टिक्स मधली प्रोबॅबिलिटीची थेअरी, कोईफिशंट ऑफ कोरिलेशन अशा गोष्टी ‘एआय’मध्ये प्रामुख्यानं वापरल्या जातात. मिळालेला डेटा प्रोसेस करणं, त्याचं वर्गीकरण करणं, त्यापासून पॅटर्न्स ओळखणं किंवा शिकणं, त्यावरून भाकितं करणं, आणि मॉडेल्स ऑप्टिमाइज करणं या सगळ्यासाठी गणितातल्या या शाखा किंवा पद्धती वापरल्या जातात.