
AI in sports training
esakal
अच्युत गोडबोले, रोहित पांढारकर
achyutrohit1@gmail.com
क्रिकेटच्या काही लीग मॅचेसमध्ये रोबोट अंपायर्स वापरणं सुरूही झालेलं आहे. प्रत्येक खेळाडूचे गुणदोष, मैदानाची स्थिती आणि प्रतिपक्षाचे स्ट्रॉंग किंवा वीक पॉइंट्स काय आहेत याचा विचार करून व्यूहरचना ठरवाव्या लागतात. हेही काम करण्यासाठी आज ‘एआय’ खूप मदत करतं. आता ‘एआय’ जिंकण्यासाठी काय व्यूहरचना करायची आणि खेळाडूने कुठल्या खेळी करायच्या हेही ‘एआय’ सांगेल. मैदानावर ‘एआय’ च्या खेळ्या काय काय असतील याविषयी...
कुठल्याही खेळामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी खूप कष्ट आणि अनेक वर्ष सतत सराव करावा लागतो. त्यासाठी खूप तज्ज्ञ प्रशिक्षक असण्याची गरज असते. क्रिकेटमध्ये पूर्वीच्या काळी आचरेकरसर सचिन तेंडुलकरला गुरु म्हणून लाभले होते. कुठल्याही खेळामध्ये खेळाडू कशा हालचाली करतो, कसा आणि किती वेगानं पळतो, क्रिकेटमध्ये, टेनिसमध्ये किंवा टेबल-टेनिसमध्ये खेळाडू बॅट किंवा रॅकेट हातात कशी धरतो यावर ट्रेनरला सतत लक्ष ठेवावं लागतं. तसंच समोरून कुठल्या पद्धतीनं आलेला बॉल परतवण्याकरता बॅट किंवा रॅकेट कशा तऱ्हेनं हातात धरावी, कुठल्या अँगलनं आणि किती वेगात फिरवावी याविषयी ट्रेनरकडून अनेक वर्ष प्रशिक्षण घेऊन सतत सराव करावा लागतो. आता प्रशिक्षणाचं हेच काम आर्टिफिशिअल इंटेलिजन्स करायला लागलं आहे.