
Sinhagad Victory
esakal
केदार फाळके
editor@esakal.com
शिवाजी महाराजांनी १६७०च्या प्रारंभी मुघलांविरुद्ध पुन्हा तीव्र मोहीम आरंभिली. औरंगजेबाला आपला पुत्र मुअज्जम आणि शिवाजी महाराज यांच्यात गुप्त संगनमत असल्याचा संशय आल्याने त्याने प्रतापराव गुजर आणि निराजी रावजी यांना अटक करण्याचा हुकूम सोडला. परंतु शाहजाद्याच्या दरबारातील एका विश्वासू प्रतिनिधीने हा हुकूम पूर्वीच कळविला होता, त्यामुळे मुअज्जमाने निराजी रावजींना सावधान करून मराठा फौजेसह निघून जाण्यास सांगितले.
ते वेगाने शिवाजी महाराजांकडे पोहोचले. औरंगजेबाचे फर्मान औरंगाबादेत पोहोचताना आठ दिवस उलटले होते; त्यामुळे मुअज्जमाने उत्तर पाठविले— ‘मराठे आधीच निघून गेले आहेत.’ या प्रसंगाने शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील दोन वर्षे टिकलेली शांतता संपुष्टात आली.