7/12 digital recoard and frauds of land
Esakal
वारसा हक्क सिरीज | भाग २
पुणे - आमच्या वाडवडलांची खूप जमीन आहे पण त्याचे पेपर्स काकाकडे आहे, त्याचं पुढे काय झालं माहिती नाही. ५ ते ६ वर्षापुर्वी मी सातबारावर माझं नाव ऑनलाइन नोंदवून घेतलं पण पुढे काही फॉलोअप घेतला नाही. पण आता माझं सात बारावर नाव आहे म्हटल्यावर ते काहीच करू शकणार नाहीत.. मुंबईत राहणारा कुणाल सांगत होता. आपल्यातील अनेकांना गावाला जमीन आहे इतकंच माहिती असतं. पण ती जमीन किती आहे, नेमकी कुठे आहे आणि त्यावर कोणती शेती होते यातली काहीच माहिती आपल्यातील अनेकांना नसते. घरातील एक कोणतरी व्यक्ती ही शेती करत असते त्यालाच तेवढी माहिती असते. बाकीच्यांना वाटत असतं.. जमीन वारसा हक्काची असल्याने तिचं कोणी काही करू शकणार नाही. पण फक्त सातबारावर नाव आलं म्हणजे त्या जमिनीची मालकी तुमची झाली का? यामध्ये अजून काय व्हायला हवं आहे? डिजिटल नोंद जरी असली तरी तेवढं पुरेसं नसतं. त्यामध्ये अनेक गोष्टी असतात, अनेक फेरफार असतात, त्या जमिनीवर कर्ज घेतलेलं असू शकतं, बँकांकडे ती जमीन गहान ठेवलेली असू शकते, कोणी तरी ती परस्पर विकलेली देखील असू शकते.
वारसा हक्कच्या मागच्या भागात आपण तोंडी व्यवहार आणि त्यातून निर्माण होणारी कायदेशीर गुंतागुंत या विषयी माहिती घेतली. या लेखात आपण डिजिटल नोंद असूनही जमिनीच्या बाबतीत कोणत्या गोष्टी तुम्ही तपासून घेणं गरजेचं आहे, ७/१२ वर नाव असलं तरीही तुमची कशाप्रकारे फसवणूक होऊ शकते, कशा प्रकारे ती जमीन हडप केली जाऊ शकते या शक्यतांविषयी माहिती घेणार आहोत. तसेच याविषयी तज्ज्ञ काय म्हणतात हे देखील समजून घेणार आहोत.