Sports Fandom
esakal
Premium| Sports Fandom: मैदानावरील खरा आनंद गेला कुठे? दिखाऊ चाहते का वाढत आहेत?
सुनंदन लेले
sdlele3@gmail.com
खेळाचे खरे चाहते जागोजागी वेगवेगळ्या रूपात भेटतात. मला या चाहत्यांचे खूप कौतुक वाटते. कोणाला दाखवायला ते मैदानावर हजर होत नाहीत. त्यांचे खरोखरच खेळावर प्रेम असते. मैदानावर जाऊन खेळ बघण्याचा काय आनंद आणि अनुभव असतो, हे ते जाणतात. म्हणूनच वाकडी वाट करून आणि प्रचंड पैसे खर्च करून ते तन्मयतेने खेळ बघताना दिसतात.
क्रि केट प्रेमापायी सगळे सोडून पूर्णवेळ फॅन झालेला सुधीर गौतम मला भेटतो. तसेच अफलातून वेगळे सिनेमे तयार करणारा आर बाल्की वेळ काढून एकटा कसोटी सामन्याचा आनंद शांतपणे घेताना दिसतो. अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करणारे निष्णात डॉक्टर जतिन कोठारी वेळात वेळ काढून क्रिकेट सामन्यांना हजर होताना दिसतात आणि एक कसोटी सामन्याचा आनंद घ्यायला बोस्टनहून दक्षिण आफ्रिकेत दाखल होणारा प्रकाश खोत बघायला मिळतो.

