
कमलेश पंडे
उद्योजक आणि स्टार्टअप्स यांचा गाभाच मुळी ‘इनोव्हेशन’ हा असतो आणि असायला हवाच. त्याचा नेमका अर्थ जाणून घ्यायला हवा. गेल्या दशकात तरुणाईचा कल उद्योजक बनण्यात स्पष्टपणे दिसून येतो. त्यामुळेच शिक्षणक्रमात त्यादृष्टीने या विषयाचा अतंर्भाव करायला हवा.
‘इनोव्हेशन’ या शब्दाचा अर्थ प्रत्येक जण आपल्या सोयी किंवा गरजेनुसार लावतो. त्यामुळे बहुतेक कंपन्यांत ‘इनोव्हेशन’संबंधी हवी तशी एकसूत्रता आढळून येत नाही. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर इनोव्हेशन ही एक प्रक्रिया आहे, जिची सुरुवात नवीन कल्पना अथवा ज्ञानाने होते आणि शेवट धनार्जनात. येथे ‘धन’ म्हणजे वेल्थ. ज्यात पैसा, शिक्षण, आरोग्य, सुरक्षा, सामाजिक आरोग्य इ. चा समावेश होतो. मात्र या लेखात आपण धनाचा अर्थ पैशापुरताच मर्यादित ठेवू.