Premium|Nanotechnology: भारतातील नॅनो तंत्रज्ञानाचा विकास - औषधनिर्मितीपासून वस्त्रोद्योगापर्यंत

नॅनो तंत्रज्ञानाच्या क्रांतीने भारतात औषधनिर्मिती आणि वस्त्रोद्योगात नवे आयाम
advanced technology
advanced technologyesakal
Updated on

डॉ. रवींद्र उटगीकर

दिसणारही नाही एवढ्या अतिसूक्ष्म आकाराच्या पदार्थांवर बेतलेले एखादे तंत्रज्ञान आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करण्याएवढे सर्वव्यापी रूप घेईल, असे भाकित कोणी दोन दशकांपूर्वी केले असते, तर आपण त्यावर क्वचितच विश्वास ठेवला असता... आज ती वेळ आली आहे. नॅनो तंत्रज्ञान आपले जगणे सुकर करणारे अनेक नवे मार्ग उपलब्ध करून देत आहे...

वि ज्ञान-तंत्रज्ञानाने गेल्या दोन शतकांमध्ये जेवढी प्रगती केली, त्यापेक्षाही गतिमानतेने गेल्या दोन दशकांत ते सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनात परिवर्तन साधू पाहात आहे. नॅनो तंत्रज्ञान हे अशाच भविष्यवेधी तंत्रज्ञानांपैकी एक. नॅनो स्तरावर वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी प्रक्रियांमधून हे तंत्रज्ञान विकसित केले जात असल्याने त्याला त्याच नावाने संबोधले जाते.

नॅनोमीटर म्हणजे एक मीटरचा एक अब्जांशावा भाग. एवढ्या सूक्ष्म अवस्थेमध्ये जेव्हा पदार्थांवर प्रक्रिया होते, तेव्हा त्यांचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म भिन्न आढळतात. आकारमानाने छोटा होताना उपलब्ध होणारे त्रिमितीय स्वरूपातील अतिरिक्त पृष्ठीय क्षेत्र हे वैशिष्ट्य घेऊन तो उपलब्ध होतो. त्याचबरोबर, क्वान्टम प्रभावामुळेही तो वेगळे गुणधर्म दाखवतो. उदाहरणार्थ पिवळाधमक रंग ही सोन्याची ओळख असली तरी नॅनो आकारात त्याचा फक्त तोच रंग राहात नाही.

सेमीकंडक्टरमध्ये वापरले जाणारे सिलिकॉन हे साधारणतः प्रकाशोत्सर्गी मानल जात नाही. परंतु नॅनो स्वरूपातील सिलिकॉनमध्ये मात्र हा गुणधर्म आढळू शकतो. सर्व विज्ञानशाखांबरोबरच अभियांत्रिकी क्षेत्रही ज्याला कवेत घेईल असे हे तंत्रज्ञान असल्यामुळे नवकल्पनाविष्कारांना गती देत ते आपल्या दैनंदिन जीवनात प्रवेश करत आहे. त्याची काही ठळक उदाहरणे अशी :

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com