
तशी आजूबाजूची परिस्थिती झोप उडावी अशीच आहे म्हणा. तुम्ही कोणीही असा; तुमचं वय कितीही असू दे. आजच्या घडीला नित्य नवी आव्हाने, नित्य नवे बदल, नित्य नवी धावपळ, त्यातून उद्भवणारे तणाव आपल्या भवतालातल्या कोणालाच चुकलेले नाहीत. कदाचित जात्यात नसाल तुम्ही, पण सुपात तर आपण सगळेच आहोत. आणि ह्या सगळ्यामुळे झोप उडणंही तसं स्वाभाविकच म्हणायचं. पण तरीही गेल्या आठवड्यात वर्ल्ड स्लीप डे –जागतिक निद्रा दिवस साजरा होत असताना सामोरी आलेली झोप उडालेल्यांची आकडेवारीच झोप उडवणारी आहे.