
अरविंद जगताप
गावात सगळ्यात मोठी डोकेदुखी झालंय ते राजकारण. आपला पोरगा गुन्हेगार होऊ नये, अशी आधी भीती वाटायची लोकांना. आता राजकारणात जाऊ नये, असं वाटतं. कारण चांगली चांगली पोरं राजकारणाच्या नादात वाया जाताहेत. हळूहळू आपण सामान्य माणसंही नेत्यांसारखी दुतोंडी होत जाणार.
या असल्या बेगडी वागण्यात आणि जगण्यात काही राम नाही. पूर्वी लोकांच्या आचरणात राम होता. आता राजकारणात उरलाय आणि गावात लोक ‘रामराम’ बोलणं कमी झालंय; पण गावाला कायमचा रामराम बोलणारे वाढलेत... वाढतीलच.