
विनायक ढवळे
vddhavale@yahoo.com
म्युच्युअल फंडातील ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ अर्थात ‘एसआयपी’ ही चांगला परतावा देणारी गुंतवणूकपद्धत असून, गेल्या काही काळात त्याची लोकप्रियता वाढली आहे. ‘एसआयपी’द्वारे दीर्घकालीन गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळणे शक्य आहे. कारण ‘एसआयपी’मुळे ‘रूपी-कॉस्ट ॲव्हरेजिंग’ आणि चक्रवाढीचा फायदा मिळतो. ही चक्रवाढीची जादू नेमकी काय आहे, हे उलगडून सांगणारा हा संवाद...