
Rohit Sharma’s captaincy in ICC tournaments : दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रविवारी १४० कोटी भारतीयांचे स्वप्न पूर्ण झाले. २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाच्या जखमा मनात ताज्या होत्या आणि पाकिस्तान यजमान असताना चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून रोहित शर्मा आणि संघाने त्या जखमा भरून काढल्या. २००२ मध्ये संयुक्त जेतेपद, २०१३ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली दुसरे जेतेपद अन् ऑस्ट्रेलियाशी बरोबरी अन् रोहितच्या नेतृत्वाखाली तिसरे जेतेपद जिंकून एक पाऊल पुढे टाकणाऱ्या भारतीय संघाचे हे यश सर्वांना चकित करणारे आहे.