
अरविंद रेणापूरकर
भारतातील वाहनांची संख्या पाहता तिची सुरक्षितता राखणे कळीचा मुद्दा बनला आहे. चारचाकी किंवा दुचाकी वाहन चोरीला जाण्याचे वाढते प्रमाण आणि घातपाती कारवायांत वाहनांचा होणारा बेकायदा वापर पाहता त्याला चाप बसविण्यासाठी तसेच वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये एकवाक्यता येण्यासाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (एचएसआरपी) बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये नंबर प्लेट बसविण्याची अंमलबजावणी होत असताना वाहतूक नियमांचे पालन काटेकोरपणे होण्यास या प्लेटचा हातभार लागणार आहे. प्रामुख्याने २०१९ पूर्वीच्या वाहनांत नवी नंबरप्लेट असणे गरजेचे आहे. एकीकडे नव्या नंबर प्लेटबाबत मोहीम सुरू असताना दुसरीकडे महाराष्ट्रात नव्याने खरेदी केलेली सुमारे दहा लाख वाहने ‘एचएसआरपी’विना धावत आहे.