प्रतिनिधीबेडरूम किंवा झोपायची खोली आपल्याला ‘रिलॅक्स मूड’मध्ये जाण्यासाठी मदत करते. दिवसभराच्या दगदगीनंतर आपण याच खोलीत येऊन विश्रांती घेतो आणि निद्रादेवीच्या अधीन होतो. शांत झोप झाली तरच दुसरा दिवस उत्साहात उगवतो! त्यासाठी या काही टिप्स....१. खोलीच्या आकारानुसार पलंगाची निवड करावी. पलंग ठेवल्यानंतर आजूबाजूला मोकळी जागा राहायला हवी. पलंगाला लागून मोठे फर्निचर असू नये. हल्ली बहुतांश घरांमध्ये हायड्रॉलिक बेड्सना पसंती दिली जाते. हायड्रॉलिक बेड्समध्ये भरपूर स्टोअरेजही मिळते आणि ते अगदी लहान मुलांनाही उचलण्यासाठी सोपे असतात.२. पलंगाच्या डोक्यापाशी हेडबोर्ड असेल, तर त्यामध्ये लाकडी, कुशन्स असलेला, असे अनेक प्रयोग करता येतील. आपल्या आवडीनुसार त्याची सजावट करता येईल..३. पलंगाच्या एका किंवा दोन्ही बाजूंना साइड टेबल/ कॉर्नर टेबल ठेवता येते. किरकोळ गोष्टींबरोबरच पुस्तके, नाइट लॅम्प वगैरे ठेवण्यासाठी उपयोगी पडते. त्याला ड्रॉवर असतील तर स्टोअरेजसाठी वापरता येते.४. बेडरूममधील एका भिंतीला लागून वॉर्डरोब करता येईल. हल्ली स्लायडिंग दरवाजांची कपाटे असल्याने जागा वाचते. कस्टमाइज्ड वॉर्डरोब घेतल्यास आपल्या गरजेनुसार त्यामध्ये कप्पे करून घेता येतात..Premium| Operation Sindoor: पाकिस्तानी जनता गोंधळलीय, लष्करी राजवट येणार का? .५. बेडरूमच्या खिडकीशेजारी बसण्यासाठी/ काम करण्यासाठी टेबल-खुर्चीची व्यवस्था करता येईल. पण टेबल नको असल्यास, नुसत्या आरामदायी खुर्च्या किंवा सेटी ठेवून छानशी सीटिंग अरेंजमेंट करता येईल.६. पलंगाच्या वर पुस्तके किंवा शोपिस ठेवण्यासाठी वॉल-माउंटेड स्टोअरेज शेल्फ करता येईल. वॉर्डरोब केल्यानंतर जागा उरत असल्यास तिथेही ओपन शेल्व्ह्ज करता येईल..Premium| Leopards: ब्युटी स्पॉट्स.बेडरूम सजवताना रंगसंगतीचा विचार करणे महत्त्वाचे आहे. बेडरूम ही सहसा आपला ‘कोझी कॉर्नर’ असतो. त्यामुळे भिंतींना रंग देताना मनाला प्रसन्न, शांत करणारे रंग निवडावेत. त्याचप्रमाणे बेडरूमध्ये लायटिंग करताना बेडसाइड लॅम्प्सच्या बरोबरीने डिमर स्विचेसचाही वापर करावा. मुलांच्या खोलीतील, गेस्ट रूममधील फर्निचर निवडताना याच टिप्सचा आधार घेता येईल..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.