
सध्याच्या जागतिक बाजारपेठेत अनेक चढ-उतार येत आहेत, ज्यामुळे आपल्या देशातील उद्योगांवरही परिणाम होत आहे. विशेषतः, कापड उद्योगासमोर एक मोठे संकट उभे ठाकले आहे. अमेरिकेने भारतीय कापडावर २५ टक्के आयात शुल्क लावल्यामुळे आपले निर्यातदार अडचणीत आले आहेत.
या पार्श्वभूमीवर, कापड निर्यातदारांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. त्यांनी सरकारला विनंती केली आहे की, कापसावरील ११ टक्के आयात शुल्क तात्काळ रद्द करावं, ज्यामुळे कच्चा माल आंतरराष्ट्रीय दराने उपलब्ध होईल.
त्याचबरोबर, त्यांनी आणखी एक महत्त्वाची मागणी केली आहे, ती म्हणजे ‘कर्जावर २ वर्षांची स्थगिती’. या स्थगितीला loan moratorium म्हणतात.
पण ‘लोन मोरेटोरियम’ म्हणजे काय तुम्हाला माहितीये का? त्याचे फायदे काय, तोटे काय? तुम्हाला ते कधी घेता येतं आणि तुम्ही ते घ्यावं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला 'सकाळ प्लस'च्या या लेखातून मिळणार आहेत...