

Parenting Tips
E sakal
The Festival Meltdown: A Pediatrician Explains Why Kids Get Cranky During Celebrations
घरात गौरी-गणपतीची लगबग सुरू असताना ५ वर्षांच्या रियाने जोरात रडायला सुरुवात केली. काही म्हणजे काहीही तिच्या मनास येत नव्हतं. आई-बाबा दोघंही हैराण झाले होते. '' रोज तर बरी असते, आता पाहुणे आलेले असतानाच काय झालंय कोण जाणे?'' तिची आई अगदी वैतागून स्वत:शीच म्हणाली.
दुसरीकडे १० वर्षांचा वेदसुद्धा वैतागला होता. त्याचा लाडका लेगोसेट मावसभावाने घेतल्यामुळे त्याचं डोकं फिरलं होतं. रिया आणि वेद दोघंही तशी खेळकर मुलं पण सणाच्या आणि पाहुणे-रावळ्यांच्या गर्दीत इतकं आनंदी वातावरण असताना यांना काय झालंय? हा एकच प्रश्न दोघांचे पालक विचारत होते.
रिया आणि वेदसारखी परिस्थिती आपल्या अनेकांच्या घरात असते. घरात सणाची लगबग सुरू आहे. घर सजवलंय, फराळाची तयारी सुरू आहे, नातेवाईक येतायत. पण मूल मात्र किरकिर करतंय, छोट्या छोट्या गोष्टींवर रडतंय, हट्ट करतंय किंवा अचानक रागावून बसतंय. पालक म्हणून अशावेळी काय करायचं हा प्रश्न पडत असेल तर हा लेख तुमच्याचसाठी आहे. जरुर वाचा आणि मुलांच्या मनात काय चाललंय ते समजून घ्या.