Premium|Parental Intervention: मुलांच्या भांडणात पालकांचा हस्तक्षेप असावा का, असेल तर तो किती असावा?

Child psychology: बालमानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून मुलांच्या भांडणात पालकांची भूमिका; पालकांनी नेमकं काय करावं.?
Parental Intervention in child conflict indian

Parental Intervention in child conflict indian

Esakal

Updated on

पुणे - सान्वीची आजी परवा काहीशी वैतागून सांगत होती की, सान्वीला हल्ली खाली सोसायटीत खेळायलाच जाऊ नको सांगतो. तिला बाकीची सोसायटीतील मुलं खूपच त्रास देतात. ती आली की तिची मुद्दामहून खोडी काढतात. हल्ली कोणी साधसं शाळेत बोललं तरी तिला रडू येतं. परवा शाळेतूही बाईंनी सांगतिलं की, ती हल्ली काहीही झालं की लगेचच रडते. शांत बसते. तिला काय होतंय हेच तिला कळत नाही. सगळी मुलं मला त्रास देतात. माझे कोणीही मित्रमैत्रिणी नाहीयेत असं ती सतत म्हणत असते. मला तिची फार काळजी वाटते..

पुर्वीच्या काळी लहान मुलांमध्ये भांडणं झाली की, बहुतांशी आईबाबा कोणताही न्यायनिवाडा न करता सगळ्यांना एकजात दम भरत होते. त्यामुळे मुलांची भांडणं ही आई बाबांपर्यंत पोहोचण्याआधी मुलांच्या पातळीवरच सोडवली जायची. पण आता मात्र मुलांमुलांमधील भांडणं हा पालकांच्या काळजीचा विषय झाला आहे. नुकतीच महाराष्ट्रात एका क्लासमधील मुलाने त्याच्याच क्लासमधील मुलावर चाकूने वार करण्याची घटना घडली. त्यामुळेच हल्ली छोटी मोठी भांडणं झाली तरी पालक सावध असतात. मुलांच्या छोट्या मोठ्या भांडणातही मध्यस्थी करतात, न्यायनिवाडा करतात किंवा सान्वीच्या आजीसारखं आपल्या मुलांना या सगळ्यापासून अलिप्त ठेवतात.

पण त्यामुळे मूल सोशल होत नाही का? त्यांच्यात ‘प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल’ येत नाही का? पण मग मोठं काही घडलं तर काय करा..? अशा सगळ्या गोष्टींनी पालकही गोंधळून जातात. पण बालमानशास्त्र या विषयी काय सांगतं, संशोधनांमध्ये काय समोर आलंय, मुलांची भावनिक बुद्धिमत्ता कशी वाढवावी? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं या लेखाच्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न करूया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com