
लहानपणापासून आपण सगळेच पहिल्या नोकरीची आणि पहिल्या पगाराची स्वप्न पाहतो. खूप कष्ट, अभ्यास आणि पदव्या मिळवण्याचा प्रवास याच स्वप्नाभोवती फिरतो. मग एक दिवस येतो... नोकरी लागते, आणि महिन्याच्या शेवटी आपल्या बँकेत ‘salary credited’ असा मेसेज येतो, तेव्हा खरी गंमत सुरू होते!
पहिला पगार हातात आल्यावर तो काही दिवसांत कसा गायब होतो याचा शोध आजवर कुणालाही लागलेला नाही. नवीन गॅजेट्स, मित्रांसोबत पार्ट्या, आवडीचे कपडे... अशा अनेक गोष्टींवर पैसे कधी खर्च होतात याचा पत्ताच लागत नाही. पण हे असं किती दिवस चालणार? एक-दोन महिने ठीक आहे, पण नेहमीच असं करून चालणार नाही.
तुमच्या कष्टाच्या पैशांची योग्य गुंतवणूक होणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. पण ती योग्य पद्धतीने कशी करायची, हा प्रश्न अनेकांना पडतो. याच प्रश्नाचं उत्तर आणि तुमच्या पहिल्या पगाराचं महत्त्व समजून घेण्यासाठी, हा लेख नक्की वाचा. चला, आता पहिल्या पगारानंतर कधी, कुठे आणि कशी गुंतवणूक करायची हे समजून घेऊ...