
MPSC Prelims study plan
esakal
पुणे – मराठवाड्यात झालेल्या मोठ्या अतिवृष्टीमुळे आणि काही ठिकाणी रस्त्यांची कनेक्टिव्हिटी तुटल्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २८ सप्टेंबर रोजी होणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे. ही परीक्षा आता ९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुमारे ३५ दिवसांचा अतिरिक्त वेळ मिळाला आहे. या वेळेचं प्रभावी नियोजन कसं करावं, याबद्दल नवनाथ वाघ सर यांनी स्टडीरूम या सकाळच्या वेबिनारमध्ये याविषयी मार्गदर्शन केले आहे.