
Bank ethical dilemma
esakal
लेखक : अभिजित मोदे
तुम्ही अनेक वर्षांपासून एका राष्ट्रीयीकृत बँकेत अधिकारी आहात. एका दिवशी तुमची जवळची सहकारी सांगते की, तिच्या वडिलांना गंभीर हृदयविकार आहे. शस्त्रक्रिया लगेच झाली नाही तर जीव जाण्याचा धोका आहे. पण तिच्याकडे ना कुठले विमा संरक्षण आहे, ना पैशांची तरतूद.
शस्त्रक्रियेचा खर्च जवळपास १० लाख रुपये आहे. तुम्हाला माहिती आहे की तिचा पती हयात नाही आणि ती खालच्या मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली आहे. त्यामुळे तुम्ही तिच्या दुःखाशी सहानुभूती व्यक्त करता, परंतु आर्थिक मदत करू शकत नाही.