
पगारात वाढ किंवा अधिक पैशांची कमाई कायमच जीवाला सुखावणारी असते पण अनेकांच्या बाबतीत हे खोटं ठरतं. होतं असं की , पगार वाढला की अधिक पैसे खर्च व्हायला लागतात. मग हप्ते वाढतात, कर वाढतो आणि भरपूर पैसे कमवू आणि मग मस्त बचत करू, असं जे स्वप्न असतं ते पार भुईसपाट होतं. शिवाय पगार वाढल्यावर जीवनशैली आणि तिचे खर्चसुद्धा वाढतातच. मग करायचं काय?