
Stray dog problem
esakal
सचिन शिंदे
देशभरात, विशेषतः दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये भटक्या श्वानांचा म्हणजेच कुत्र्यांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आहे. अलीकडच्याच काही दिवसातील बातमी आहे की, एक राष्ट्रीय दर्जाचा कुस्तीपटू एका भटक्या रेबीज असलेल्या श्वानाच्या चावण्याने दगावला.
या आणि अशा अनेक श्वानदंश, अपघात आणि प्राणी-मनुष्य संघर्षाच्या घटना वाढत आहेत. तसेच, हे श्वान अनेकदा रोगांचे प्रसारक ठरतात. देशातील विविध भागात रस्त्यांवर कुत्र्यांची भीती आणि असुरक्षितता वाढल्यामुळे हा विषय सामाजिक व प्रशासनिक चर्चेचा भाग झाला आहे.