
How Will Artificial Intelligence Affect Jobs: "आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) म्हणजे केवळ नोकऱ्या जाणं नव्हे, तर नव्या संधींचं मोठं दार उघडणं!" असं ठाम मत करिअर मार्गदर्शक प्रा. विजय नवले यांनी व्यक्त केलं. सकाळ मिडिया आयोजित 'AI युगात यशस्वी होण्याचा मार्ग' या विषयावर झालेल्या वेबिनारमध्ये त्यांनी युवकांनी बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत नवे मार्ग शोधावेत, असं आवाहन केलं.