
डॉ. शैलेंद्र देवळाणकर
डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘रेसिप्रोकल टेरिफ अलाइनमेंट’अंतर्गत (जशाच तसा कर) दोन एप्रिल रोजी जगातील अनेक देशांविरुद्ध नव्या आयात शुल्क आकारणीची घोषणा करून जगभरामध्ये खळबळ उडवून दिली. यामध्ये चीनवर करण्यात आलेली करआकारणी ही सर्वाधिक आहे. त्याला आता तात्पुरती स्थगिती दिली असली, या धोरणाचे दूरगामी परिणाम होतील.
जशाच तसा कराच्या अमेरिकेच्या धोरणाच्या निमित्ताने ट्रम्प यांच्या चीनविषयीच्या रागाची कारणे जाणून घेतली पाहिजेत. आज अमेरिकन अर्थव्यवस्थेचा आकार सुमारे ३२ ट्रिलियन डॉलर आहे. अमेरिकेवरील एकूण कर्ज ३८ ट्रिलियन डॉलर आहे. म्हणजेच जीडीपीपेक्षा जास्त कर्जाच्या बोजाखाली ही महासत्ता दबलेली आहे. अमेरिकेची सकल व्यापारतूट ही प्रतिवर्षी सुमारे दोन ट्रिलियन डॉलर इतकी आहे.