Premium|Lata Mangeshkar and Asha Bhosle: ‘‘ हे सरस्वतीचे दास, सच्चे सेवक, माझ्या मुलांबरोबर अक्षय राहतील’’

Hridaynath Mangeshkar Raksha Bandhan Memories : पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितलेल्या रक्षाबंधनाच्या आठवणींत लतादीदी, आशाताई, आई माई आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे भावविश्व उलगडते. संगीतनिष्ठा, गुरुभक्ती आणि कठीण काळातील संस्कार यांचा हा हृद्य पट आहे.
Lata Mangeshkar and Asha Bhosle

Lata Mangeshkar and Asha Bhosle

esakal

Updated on: 

हृदयनाथ मंगेशकर

पंडित हृदयनाथ मंगेशकर आपल्या बालपणीच्या आठवणीतले रक्षाबंधन सांगत आहेत. लतादीदी आणि आशाताई यांच्या सहवासातल्या रक्षाबंधनाच्या आठवणी आजही त्यांच्या मनात तितकाच ताज्या आहेत. आईने त्यांना त्या दिवशी काय संगितले, या सगळ्यांचे वडील अर्थातच मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या शिकवणीबद्दल तसेच त्यांच्या तत्त्ववादी वागण्याबद्दल माईंनी जे संगितले ते अलौकिक होते. काय सांगितले माईंनी? उलगडला आहे आठवणींचा तो पट स्वतः पंडितजींनी...

अग ! आमच्यावर अशी गुरुकृपा आहे, की

आम्हाला मरुभूमीत जरी फेकले, तरी मृगजळ

सुद्धा आम्हाला पाणी पाजेल.

कारण आमचे बाबा,

मेघमल्हाराची एक अशी आलापी घेतील, की

त्या आलापीच्या मृदुलतेने,

आकाशाच्या हृदयाला निर्झरु फुटेल,

खळाळ् आवाज करीत कोसळण्याऐवजी

घुणघुणा निनादत तो मरुभूमीत निर्मल

जलाशय निर्माण करील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com