
केदार गोरे
gore.kedar@gmail.com
बिबट्यांची उत्पत्ती सुमारे दहा लाख वर्षांपूर्वी आफ्रिका खंडावर झाली असल्याचे पुरावे मिळाले आहेत. भारतापुरता विचार केल्यास बिबट्यांची संख्या साधारण २५,००० असावी असा अंदाज वन्यजीव अभ्यासक वर्तवितात. आज ‘जागतिक बिबट्या दिन’. त्यानिमित्त बिबट्यासारख्या हिंस्र वन्य जीवांबरोबरच्या सहजीवनाच्या मर्यादा लक्षात घेऊन वास्तववादी उपायांवर गांभीर्याने विचारविनिमय करण्याची आवश्यकता आहे.
प्राणी विश्वातील सर्वात देखणा प्राणी कोणता, या प्रश्नाचे उत्तर जर मला द्यायचे असेल तर मी ‘बिबट्या’ असे म्हणेन. लहानपणी जेव्हा रुडयार्ड किपलिंग लिखित ‘जंगल बुक’ या पुस्तकावर आधारित सिनेमा पाहिला तेव्हा त्यातील ‘बघेरा’ हा काळा बिबट्या जितका मोगलीचा दोस्त झाला तितकाच मनोमन तो माझाही दोस्त झाला.