
Human lifespan Research
esakal
फ्रान्समध्ये एन् वियाजर नावाची एक करार पद्धत आहे. या करारानुसार, एखाद्या खरेदीदारानं किमान रक्कम देऊन एखादं घर स्वतःच्या नावावर करायचं आणि मूळ मालकाला त्याच्या किंवा तिच्या मृत्यूपर्यंत त्याच घरातच राहू द्यायचं. खरेदीदारानं दर महिन्याला मूळ मालकाला एक ठराविक रक्कम देत राहायचं, जेणेकरून त्या व्यक्तीचा चरितार्थ चालेल. प्रामुख्यानं, एकटं राहणाऱ्या वृद्ध फ्रेंच नागरिकांसाठी ही करार पद्धत वापरात आहे. वृद्ध नागरिकांकडून हप्त्यानं घर विकत घेण्यासारखं असतं हे. जीनी कालमेंट यांच्याशी खरेदीदारानं व्यवहार केला १९६९मध्ये. तेव्हा कालमेंट यांचं वय होतं ९४. खरेदीदाराच्या अंदाजानुसार कालमेंट यांचा मृत्यू स्वाभाविक होता. प्रत्यक्षात खरेदीदारासाठी हा व्यवहार अत्यंत तोट्याचा ठरला! खरेदीदाराचा १९९५मध्ये मृत्यू झाला, तेव्हा त्यानं दोन लाख डॉलर्सचे हप्ते कालमेंट यांना दिले होते. घराच्या मूळ किमतीच्या दुप्पट खर्च करून झाला होता. मात्र, कालमेंट ठणठणीत होत्या. त्यांचं वय १२० वर्षे होतं!