
Human mind evolution
esakal
एका पिंजऱ्यात काही माकडे ठेवण्यात आली होती. साखळी खेचली, की माकडांना बक्षीस म्हणून काहीतरी खायला मिळायचे. पण लगतच्या पिंजऱ्यातील माकडाला विजेचा झटका बसायचा. त्याच्या त्या वेदना बक्षीस म्हणून खायला मिळालेल्या माकडाला समोर लावलेल्या आरशात दिसायच्या. त्यामुळे खायला मिळणे बंद होत असले तरी ते साखळी खेचणे टाळायचे. आपल्याच जमातीतील इतरांना त्रास होऊ नये, यासाठी त्यांचा त्याग त्यांना जाणिवा आहेत की नाही, हे स्पष्टपणे अधोरेखित करतो.
मा नवी शरीराची जडणघडण जेवढी गुंतागुंतीची आहे तेवढीच मानवी मनाची अवस्थादेखील क्लिष्ट आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. मुळात मन विकसित होत जाते ते शारीरिक बदलांमधूनच. माणसाच्या मनात तयार होणारे भावनांचे गोंधळ शरीरातील बदलांपासूनच उद्भवत असतात. आज आपण मानवी परिप्रेक्ष्यातून भावना कशा निर्माण झाल्या, याचा विचार केला तर त्याचे मूळ आपल्या शरीरातच आढळते. त्यामुळेच सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ विल्यम जेम्स म्हणतो, की भावना शरीरातील बदलांपासूनच उद्भवतात. आपले विचार सतत वाहणाऱ्या प्रवाहासारखे असतात, ते तुटक नसतात.