Premium|Digital Memory Rights : मैं अगर भूल भी जाऊं...तो ये हक है मुझको!

Digital memory & trauma analysis : डिजिटल युगात स्मृती साठवण्याच्या वाढत्या ओढ्यामुळे मानवी विस्मृतीचे नैसर्गिक वरदान हरवत चालले असून, अनुभवांचे शहाणपण टिकवण्यासाठी यंत्रांऐवजी शरीरात स्मृती मुरवणे आणि विसरण्याचा हक्क जोपासणे आता काळाची गरज बनली आहे.
Digital Memory Rights

Digital Memory Rights

esakal

Updated on

विश्राम ढोले, माध्यम, तंत्रज्ञान व संस्कृतीचे अभ्यासक

प्रत्येक आठवणीसरशी आपण स्मृतींची फेरमांडणी करीत असतो. त्यातूनच आपण थोडे थोडे बदलत असतो; थोडे थोडे घडत असतो. हे असे करतो म्हणून तर अनुभवांमधून आपण शहाणे होतो.

मायक्रोसॉफ्टमध्ये काम करणारे संशोधक गॉर्डन बेल यांनी १९९८ मध्ये एक जगावेगळा प्रयोग केला. तो स्वतःवरच होता. त्याला त्यांनी नाव दिले ‘मायलाईफबिटस्’. त्यात त्याने त्यांच्याकडची सारी कागदपत्रे, पुस्तके, पत्रे, छायाचित्रे स्कॅन केली. इंटरनेटवापराच्या साऱ्या नोंदी ठेवल्या. घरगुती व्हिडिओ, ध्वनीफिती यांचे डिजिटायझेशन केले. पुढे २००४ पासून तर ते आवाज रेकॉर्ड करणारी आणि आपोआप छायाचित्रे घेऊ शकणारी यंत्रे अंगावर बाळगूनच चोवीस तास राहू लागले. त्यामुळे त्यांचे सारे संभाषण, भेटीगाठी, दिनचर्या, ऐकलेले संगीत, पाहिलेले चित्रपट अशा साऱ्याच गोष्टींची डिजिटल नोंद व्हायला लागली. एका अर्थाने बेल यांनी त्यांच्या जगण्यातील जवळजवळ सर्वच कागदपत्रांच्या, कृतींच्या आणि क्षणांच्या तपशीलवार ‘डिजिटल नोंदी’ साठवून ठेवल्या. पुढे सहसंशोधक गेमेल यांच्यासोबत त्यांनी या प्रयोगावर आधारित पुस्तकही लिहिले- ‘टोटल रिकॉल’. या प्रयोगाच्या अनुभवाबाबत बोलताना ते एकदा म्हणाले होते, “मी आता आठवण्याच्या भानगडीतून मोकळा झालोय आणि विसरण्याच्या भीतीपासून मुक्त झालोय.”

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com