
डॉ. गुरुदास नूलकर
भा रतात हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वे इंजिनची पहिली चाचणी या महिन्यात यशस्वीपणे पार पडली. चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरी मध्ये १२०० एचपी इंजिन क्षमतेची हायड्रोजन इंजिन विकसित होत आहे. या वर्षी फेब्रुवारीत कोची बंदरात हायड्रोजनवर चालणाऱ्या ‘कॅटॅमरॅन बोटी’ची चाचणी यशस्वीपणे पार पडली.
याचबरोबर भारतात हायड्रोजन बस आणि हेवी-ड्युटी ट्रकच्या चाचण्या सुरू आहेत. लांब पल्ल्याच्या मालवाहतुकीसाठी हायड्रोजन हे योग्य इंधन आहे, आणि हरितगृहवायू उत्सर्जनविरहित मार्ग आहे, यात आता शंका नाही. आज भारताकडे रास्त किमतीत हायड्रोजननिर्मिती करण्याचे तंत्रज्ञान आहे आणि त्यामुळेच देशात या चाचण्या जोरात चालू आहेत. बॅटरीवर चालणाऱ्या विद्युत वाहनांपेक्षा हायड्रोजन इंजिनचा पल्ला कित्येक पट जास्त असतो.