IFFI Goa App Ticketing Rules
esakal
प्रीमियम आर्टिकल
Premium|IFFI Goa App Ticketing Rules : ‘इफ्फी’चा बदलता चेहरा; नियमांच्या जंजाळात अडकलेले सिनेमाप्रेमी
Film festival Management Issues : ५६ व्या इफ्फी (गोवा) महोत्सवात एका बाजूला धर्मेंद्र यांना आदरांजली आणि जपानी सिनेमांसारखे सकारात्मक पैलू असले तरी, दुसऱ्या बाजूला ओटीटी प्लॅटफॉर्मच्या स्पर्धेमुळे आणि अॅप-आधारित तिकीट बुकिंगच्या जाचक नियमांमुळे प्रेक्षकांना चित्रपट पाहणे कठीण झाले असून 'रश लाइन' बंद केल्याने महोत्सवाचे महत्त्व कमी होण्याची शक्यता लेखकाने व्यक्त केली आहे.
महेश बर्दापूरकर
‘इफ्फी’मध्ये कर्नाटक सरकारच्या सहकार्याने ‘शोले’ या चित्रपटातील ‘ये दोस्ती हम नहीं छोडेंगे’ हे गाणे चित्रित केलेली ‘बीएसए डब्ल्यूएम२०’ ही १९४२चे मॉडेल असलेली मोटारसायकल प्रेक्षकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आली होती. मोटारसायकलचा क्रमांक होता ‘एमवायबी ३०४७’. त्याचबरोबर ‘शोले’ला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त चित्रपटाचे खेळही आयोजित करण्यात आले होते. दुर्दैवाने महोत्सव मध्यावर असतानाच ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबरला निधन झाले व त्यामुळे या मोटारसायकलचे दर्शन हा प्रेक्षकांसाठी हळवा क्षण बनला. प्रेक्षकांनी या मोटारसायकलसमवेत फोटो काढत धर्मेंद यांना आदरांजली वाहिली...

