
H-1B Visa restrictions
esakal
पूनम शर्मा
editor@globalstratview.com
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच ‘एच-वन बी’ व्हिसाच्या शुल्कामध्ये मोठी वाढ करून ते थेट एक लाख डॉलरवर नेले. त्याचा जबर फटका अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांना बसू शकतो. ‘जागतिक नेतृत्वा’चा किताब जर अमेरिकेला कायम टिकवायचा असेल तर त्यांना नव्याने समतोल साधण्याचा विचार करावा लागेल...
अन्यथा भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला मुकावे लागेल.
अमेरिकेला स्वप्नांचा देश म्हटले जाते. कितीतरी जण ते पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर झगडत राहतात. या स्वप्ननगरीमध्ये शिक्षण घेणे किंवा नोकरी करणे हे असंख्य भारतीय तरुणांचे कैक वर्षांपासूनचे स्वप्न राहिले आहे. भारतातील बुद्धिमान तरुणांना खरा वाव कुठे मिळत असेल तर तो अमेरिकतच, हे अनेकांच्या डोक्यात अगदी पक्के बसले आहे.