
GST rate cut India
esakal
डॉ. संतोष दास्ताने
वस्तू स्वस्त होतील, भाववाढीचा निर्देशांक नरम होईल, मागणी वाढेल, असा भक्कम आशावाद सध्या सर्वत्र व्यक्त होत आहे. पण जुन्या समस्यांची सोडवणूक करून अर्थव्यवस्था बळकटीसाठी प्रयत्नांची गरज आहे. तसे केले तरच हा आशावाद खरा ठरेल.
पं तप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात व्यवसायसुलभता आणि व्यवहारसुलभता देशात येणे गरजेचे आहे, हे अधोरेखित केले. त्यानुसार ज्या विविध गोष्टी करण्यात आल्या, त्यात वस्तू-सेवा करातील (जीएसटी) कायद्यातील आमूलाग्र फेरबदलांचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे.