
विक्रम अवसरीकर
vikram.awasarikar@gmail.com
कर्ज महागणे, अर्थव्यवस्था मंदावणे, बेरोजगारी, शेअर बाजारात तेजी किंवा मंदी, चलनावर ताण अशा प्रकारे अर्थव्यवस्थेला धक्के सातत्याने बसत असतात. या चक्रातील सर्व गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात; मात्र ‘या वेळेस जरा वेगळे आहे’ असे म्हणत न राहता पूर्वी असे घडले होते तेव्हा त्यावर काय उपाय काढले गेले होते, याचा अभ्यास करून मार्ग काढणे गरजेचे असते. हे सांगणारा हा लेख ‘धिस टाइम इज डिफरंट’ या पुस्तकावर आधारित आहे. त्याच्या लेखिका कार्मेन राईनहार्ट या मेरीलँड विद्यापीठात, तर सहलेखक केनेथ रोगोफ हे हार्वर्डमध्ये अर्थशास्त्र शिकवतात.