Premium|Roots and Identity : मुळं घट्ट असतील तर वादळातही माणूस ठाम उभा राहतो

Village Connection in Mumbai Life : मुंबईत जन्म, शिक्षण आणि नोकरी झाली तरी माणसाच्या मनातलं गावपण कायम राहतं. संकटात ठाम उभ्या राहणाऱ्या झाडांसारखी माणसाची मुळं त्याला ओळख आणि आधार देतात.
Roots and Identity

Roots and Identity

esakal

Updated on

सिद्धेश सावंत - sakal.avtaran@gmail.com

‘मुळात कसंय ना...’ असं बोलताना आपण कित्येकदा म्हणून जातो; पण मूळ शोधण्याचा प्रयत्न करताना लक्षात येतं, की फार खोलवर जावं लागतं. वरवरच्या गोष्टीत उथळपणा असतो, याची जाणीव होत जाते. मुळात शिरू लागल्यावर अनेक गोष्टी उलगडतात.

वादळात अनेक झाडं उन्मळून पडतात. जी उन्मळून पडतात, त्यांची मुळं कमकुवत झालेली असतात, असं विज्ञान सांगतं; पण वादळातही काही वृक्ष जागच्या जागी आपल्या मुळांना घट्ट धरून ठेवतात आणि ठामपणे दिमाखात उभे राहतातच की, हो ना..?

उभं राहण्याचं हेच तत्त्वज्ञान माणसाच्या मुळांशी जोडून घ्यायला हरकत नाही, हे मला कळायला तसा बराच उशीर झाला. मुंबईतल्या चाळीत लहानाचा मोठा झालो. तेव्हा शेजारचे, आसपासचे, शाळेतले, क्लासमधले असे मित्र लगेच जोडले जाण्यामागे गावपण हे महत्त्वाचं कारण होतं. जन्म, शिक्षण, नोकरी आणि लग्न हे सगळं मुंबईत झालेलं असूनही गावपण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी घर करून राहतंच प्रत्येकाच्या...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com