
सुरेश इंगळे
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. आतापर्यंतचा अनुभव पाहता, बहुतांश जिल्हा परिषदांमध्ये सत्ताधारी पक्षांना कौल मिळू शकतो. मात्र, या निवडणुकांमध्ये स्थानिक समीकरणेही महत्त्वाची ठरत असतात. त्यामुळे, स्थानिक समीकरणे किती प्रभावी ठरतात आणि सत्तेतील पक्षांमध्ये कसा समझोता होतो, यावरच या निवडणुकांचा निकाल अवलंबून असेल.