Premium|Marathi Actress Journey : शून्यातून शिखरापर्यंतचा प्रवास; नम्रता संभेरावची स्वतःशी स्पर्धा आणि मराठी रंगभूमीवरील झंझावाती इनिंग

Marathi entertainment success story : शून्यातून आलेल्या नम्रता संभेरावने गिरणगावातील भीती, संघर्ष आणि कष्टातून रंगभूमी, टेलिव्हिजन व सिनेमात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करत मराठी प्रेक्षकांच्या मनात घर केलं
Marathi entertainment success story

Marathi entertainment success story

esakal

Updated on

आशिष पाथरे - sakal.avtaran@gmail.com

भीती... शेकडो लोकांसमोर मंचावर उभं राहण्याची...

इतर लोक बोलतात तशी स्वच्छ-सुंदर

मराठी बोलण्याची...

कुटुंबासाठी माहीत नसलेल्या क्षेत्रात स्वतःला

प्रूव्ह करण्याची...

अत्यंत अनिश्चित करिअरमध्ये स्वतःचं नाव बनवण्याची... टिकून राहण्याची...

अपडेटेड राहण्याची... काम मिळवण्याची...

कामातून लौकिक मिळवण्याची...

भीती... अनेक प्रकारची...

नम्रता आवटे-संभेरावलाही वाटत होती... मुंबईतल्या काळाचौकीतल्या ‘मो. चु. मेहता गर्ल्स स्कूल तथा शिवाजी विद्यालय’ शाळेत शिकणारी, समोरच्या शहीद भगतसिंग मैदानात खो-खो खेळणारी आणि गिरणगावात राहणारी नम्रता शाळेतल्या एकपात्री अभिनय स्पर्धेत भाग घेतानासुद्धा घाबरली होती. ही भीती होती पाठांतर होईल का? ऐनवेळी आत्मविश्वासाने टांग दिली तर? इत्यादी गोष्टींची... मग?? मग काय???

‘दान पावलं’ इति : वासुदेव

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com