
Middle Class Carries India’s Tax Burden: A State-wise Analysis
उत्पन्नकर अर्थात इन्कम टॅक्स हा देशभरातली जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय. कोण किती कर भरते, कोणत्या राज्यातून सर्वात जास्त महसुल उत्पादन होते, अशा चर्चा कायमच सुरू असतात. महाराष्ट्र या आर्थिक बाबींमध्ये नेहमीप्रमाणे पुढेच आहे पण पारंपरिक आर्थिक शक्ती आणि व्यापार हाच पारंपरिक व्यवसाय मानल्या जाणाऱ्या गुजरातमधून अपेक्षेपेक्षा बराच कमी करभरणा होत असल्याचं दिसतंय. अगदी झारखंड, बिहारनेही गुजरातला मागे टाकलंय. असं का झालं?