
डॉ. प्रताप सी रेड्डी
भारतातील अवयवदानाचा दर एक लाखांमागे फक्त ०.६५ असून, स्पेन आणि क्रोएशियासारख्या देशांमध्ये एक लाखांमागे ३२-३६ अवयवदाते असतात. ही दरी लक्षात घेता भारतातील अवयवदानाचे प्रमाण वाढायला हवे, हे लक्षात येते. आजच्या (ता. १३) जागतिक अवयवदान दिवसाच्या निमित्ताने...
देशात दरवर्षी जवळपास पाच लाख जणांना अवयव प्रत्यारोपणाची (ट्रान्सप्लान्ट) वाट पाहात जिवाला मुकावे लागते. त्यामुळेच आपल्याकडे अवयव प्रत्यारोपणासाठी अवयवांची गरज आणि उपलब्धता यांतील दरी भरून काढण्यासाठी विशेष प्रयत्न हवे आहेत.